Pages

Saturday, September 1, 2012

उस्‍मानाबाद जिल्‍हयात बीएसएनएल सीमकार्डचा तुटवडा

उस्मानाबाद जिल्ह्यातील भारत संचार निगङ्क लिमिटेडच्या (बीएसएनएल)उदासीन धोरणामुळे महाकृषी संचार योजनेंतर्गत सीमकार्डचा तुटवडा गेल्या दोन महिन्यापूर्वीसून झाले असून शेतकर्‍यांना सीमकार्डसाठी कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत असल्याने बीएसएनएलच्या मनमानी कारभाराबद्दल शेतकर्‍यात संताप व्यक्त केला जात आहे. आजवर शेतकर्‍यांच्या हिताच्या योजना कमी प्रमणात राबविल्याने उन्नती साधत नव्हती. मात्र महाकृषी संचार योजनेने शेतकरीवर्ग हायटेक होत असून शेतकर्‍यांना या योजनेमुळे कृषी विभागाच्या अधिकार्‍यांशी थेट व मोफत संपर्क साधता येत असल्याने दिवसेंदिवस सीमकार्डच्या मागणीत वाढ होताना दिसत आहे. बीएसएनएलने खास शेतकर्‍यांसाठी ही योजना राबवित आहे.शेतकर्‍यांसाठी असलेल्या या योजनेंतर्गत सातबारा व कृषी विभागाच्या पत्रावर मोफत सिमकार्ड मिळत आहे. नेहमीच्या वापरातील बीएसएनएलचा नंबर शेतकर्‍यांकडे असल्यास तोच नंबर अर्ज देऊन या योजनेत कन्व्हर्टकरता येण्याची सुविधाही आहे. शेतकर्‍यांना कृषी कर्मचार्‍यांशी सतत संपर्क करावा लागतो. कृषी खात्यामार्फतही जैविक कीड नियंत्रणासारख्या कार्यक्रमांतर्गत पिकांवर कीड आणि उपाययोजनांसाठी एसएमएसद्वारे माहिती गावागावांतील निवडक शेतकर्‍यांना दिली जाते. हे शेतकरी आपापल्या गावातील अन्य शेतकर्‍यांना एसएमएस अथवा प्रत्यक्ष संभाषणाद्वारे ही माहिती पुढे पोचवतात. हे काम या महाकृषी संचार योजनेच्या सीयूजी (क्लोज युजर ग्रुप) माध्यमातून सोपे झाले आहे. मध्यंतराच्या काळात बीएसएनएलने या योजनेतील कार्डची विक्री बंद केली होती. या योजनेचा लाभ शेतकर्‍यांना होऊ लागल्याने सिमकार्डची मागणीत वाढ होऊ लागली होती. त्यामुळे बीएसएनएलने देखील खासगी कंपन्यांना टक्कर देण्यासाठी पुन्हा योजना कार्यान्वित केली. शेतकर्‍यांना न्यू महाकृषी योजनेचा सिमकार्ड वितरित केले जात आहे. ही योजना पोस्टपेड आणि प्रीपेड या दोन्ही प्रकारात आहे. या योजनेतील सिमकार्ड घेण्यासाठी शेतकर्‍यांनी तालुका कृषी कार्यालयातून शेतकरी असल्याचा दाखला कागदपत्रांसमवेत जोडून शेतकरी बीएसएनएल कार्यालयात चकरा मारीत आहेत. न्यू महाकृषी संचार पोस्टपेडसाठी मासिक भाडे केवळ ९८ रुपये, तर प्रीपेडसाठी १०८ रुपये असून, सीयूजी अंतर्गत केले जाणारे सर्व कॉल मोफत असतील, अन्य कोणत्याही नेटवर्कसाठी २०० मिनिटे व बीएसएनएलसाठी ३०० मिनिटे मोफत बोलता येईल. महिनाभरात ४०० एसएमएस मोफत करता येतील. जीपीआरएसअंतर्गत २०० एमबी डाऊनलोड मोफत राहील. या योजनेच्या सुविधेनंतर कोणत्याही मोबाईलशी फक्‍त ४० पैशांत, बीएसएनएलच्या नेटववर्कमध्ये ३० पैशांत आणि मोबाईलवरून लॅण्डलाइनशी ३० पैसे प्रती मिनीट कॉल दर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकार्‍यानी तात्काळ उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सीमकार्ड उपलब्ध करुन देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

No comments:

Post a Comment