Pages

Saturday, September 1, 2012

दिशा दर्शक फलक कोरा उभा असल्याने वाहनचालकांची गोची

कर्नाटकसह आंध्रप्रदेशातील भाविकांना श्री क्षेञ तुळजापूरला देवीच्याच दर्शनासाठी नळदुर्ग मार्गे जाण्या, येण्याचा सोयीचा एकमेव मार्ग आहे. माञ राष्ट्रीय महामार्गापासून तुळजापूरकडे जाणा-या फाटयावर दिशा दर्शक फलक गेल्याय अनेक वर्षापासून कशाचाही उल्लेख नसलेला उभा असल्याने भाविक प्रवाशी, वाहनचालकांची फसवणूक होत असून संबंधित खात्याच्या गलथान कारभाराबदृल वाहनचालक व भाविक प्रवाशांतून संताप व्यक्त केला जात आहे. नळदुर्ग हे सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर वसलेले शहर आहे. या ठिकाणाहून आंध्रप्रदेश व कर्नाटक राज्याच्या सीमा जवळच आहेत. त्यामुळे श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शासाठी चोवीस तास नळदुर्ग मार्गे भाविक प्रवाशांचे वाहन ये-जा करतात. त्या्चबरोबर तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक राज्यावतून नळदुर्ग मार्गे तुळजापूर, बीड, औरंगाबाद आणि तेथून पुढे मध्यप्रदेश, हरियाणा, गुजरात, राजस्थान, पंजाब यासह देशातील विविध प्रांतात माल वाहतूक करणारे शासकीय, निमशासकीय ट्रकांची एकसारखी रिघ असते. नळदुर्गहून तुळजापूरकडे जाणा-या रस्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने वाहनचालकांना मार्गदर्शन व्हावे, याकरिता दिशा दर्शक फलक लावलेच नाही. त्यामुळे केवळ रस्याची माहिती मिळत नसल्याने अनेक वाहनचालकांची पंचाईत होताना दिसत आहे. रस्‍त्‍याच्‍या कडेला लावलेलल्या दिशा दर्शक फलकावर कशाचाही उल्लेख नाही. हा फलक गेल्या अनेक वर्षापासून उभा असून सार्वजनिक बांधकाम विभागाला या फलकाचा विसर तर पडला नाही, अशी प्रतिक्रिया वाहनचालकांतून होत आहे. तात्काळ संबंधितांची चौकशी करुन दोषीवर कडक कारवाई करावी व या फलकावर दिशा दर्शकाची माहिती देण्याची मागणी प्रवाशी,वाहनचालकांतून होत आहे.

No comments:

Post a Comment