Pages

Tuesday, September 11, 2012

नळदुर्ग भुईकोट किल्‍ल्‍याची पर्यावरण व सांस्कृतिक मंञ्याकडून पाहणी


नळदुर्ग – मराठवाडयातील नळदुर्ग येथील इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभा असलेल्‍या भुईकोट किल्‍ल्‍याची खासगी सामाजिक संस्‍थामार्फत सुधारणा करुन देशातील एक उत्‍कृष्‍ट पर्यटन केंद्र निर्माण करण्‍यासाठी गड किल्‍ल्‍याचे संरक्षण व पर्यटकांना आकर्षित करण्‍यासाठी शासनाने हा किल्‍ला पर्यटकांसाठी खासगी सामाजिक संस्‍थाकडे बांधा वापरा हस्‍तांतरण करा, या तत्‍त्‍वाने भाडयाने देवून किल्‍ल्‍याची जपवणूक करण्‍याबाबत मंगळवार दि. 11 सप्‍टेंबर रोजी पर्यावरण व सांस्‍कृतिक खात्‍याचे कॅबीनेट मंञी ना. संजय देवताळे, पालकमंञी ना. मधुकरराव चव्‍हाण यांच्‍यासह पुरातत्‍व खात्‍याच्‍या अधिका-यांनी किल्‍ल्‍यास भेट देवून पाहणी केली.
  पर्यावरण व सांस्‍कृतिक मंञी ना. संजय देवताळे, पालकमंञी ना. मधुकरराव चव्‍हाण, खा. पद्मसिंह पाटील, पुरातत्‍व खात्‍याचे संचालक संजय पाटील, सहायक संचालक राहुल भोसले, अवल सचिव ना.सी. भोगे, जिल्‍हा कॉंग्रेस अध्‍यक्ष आप्‍पासाहेब पाटील, राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्‍हा कार्याध्‍यक्ष सुरेश देशमुख, तहसिलदार व्‍ही.एल. कोळी, पुरातत्‍व खात्‍याचे माजी संचालक जामखेडकर, गोपाळ गोदे, मजूर संघाचे अध्‍यक्ष नारायण ननवरे, युनिटी मल्‍टीकॉनचे संचालक कफील मौलवी, अनिल पाटील, नगराध्‍यक्ष नितीन कासार, मुख्‍याधिकारी राजेश जाधव, माजी उपनगराध्‍यक्ष नयर जहागिरदार, पं.स. उपसभापती प्रकाश चव्‍हाण यांच्‍यासह अधिकारी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

  यावेळी प्रे‍क्षणीय नरमादी (सध्‍या बंद) धबधबा, पाणी महाल, रंगमहाल, उपली बुरूज, नव बुरूज, परंडा बुरूज, बारादरी आदीसह इतर परिसराची प्रमुख मान्‍यवरांनी पाहणी केली. या कार्यक्रमाचे सुञसंचालन उपनगराध्‍यक्ष शहबाज काझी यांनी केले तर आभार कॉंग्रेस सेवा दलाचे शहराध्‍यक्ष विनायक अहंकारी यांनी मानले.

No comments:

Post a Comment